मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका लवकरच मराठीत येत आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचं डब व्हर्जन आता मराठीत येत आहे.
‘गोकुळधामची दुनियादारी’ असे या मालिकेचे नाव असणार आहे. फक्त मराठी या वाहिनीवर ही मालिका पाहता येणार आहे.
डिसेंबर २४ पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मूळ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या हिंदी मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. घरातील लहानांपासून-वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील ही मालिका पाहतात.
मूळ हिंदीतील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या ११ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे.
ही हिंदी मालिका १८ जुलै २००९ पासून सुरु झाली होती. या हिंदी मालिकेतील जेठालाल-दया हे मुख्य पात्र आहेत. तर आत्माराम-माधवी भिडे हे मराठमोळं बिऱ्हाड दाखवलं आहे.
अनेकतेत एकता
या हिंदी मालिकेत विविध धर्मातील लोकं एका इमारतीत राहतात. एकत्र राहून सणोत्सव साजरे करतात. अनेक धम्माल आणि पेचात्मक घटन या मालिकेत घडत असतात.