रखरखत्या उन्हातही फोफावतोय स्वाईन फ्लू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यात स्वाईन फ्लूच्या वाढत्या आजारामुळे आरोग्य विभागाच्या कपाळावरील आठ्यांवर वाढ होऊ लागली आहे. जानेवारी पासून आतापर्यंत म्हणजे गेल्या 4 महिन्यांत राज्यात 120 जणांचा बळी गेला आहे. तर तब्बल 613 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.    रखरखत्या उन्हातही स्वाइन फ्लूची लागण होत आहे. त्यामुळे अनेकांचा बळी जात असल्याने आरोग्य विभाग […]

रखरखत्या उन्हातही फोफावतोय स्वाईन फ्लू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात स्वाईन फ्लूच्या वाढत्या आजारामुळे आरोग्य विभागाच्या कपाळावरील आठ्यांवर वाढ होऊ लागली आहे. जानेवारी पासून आतापर्यंत म्हणजे गेल्या 4 महिन्यांत राज्यात 120 जणांचा बळी गेला आहे. तर तब्बल 613 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. 

 

रखरखत्या उन्हातही स्वाइन फ्लूची लागण होत आहे. त्यामुळे अनेकांचा बळी जात असल्याने आरोग्य विभाग चिंताक्रांत बनले आहे. आतापर्यंत 5 लाख 86 हजार संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, नगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूमुळे पेशंट दगावले आहेत. 

 

जानेवारी महिन्यात 4 तर फेब्रुवारी महिन्यात स्वाईन फ्लूचे राज्यात 7 बळी गेले. तसंच मार्च महिन्यात सर्वाधिक 77 तर एप्रिल महिन्यात आतापर्यंत 32 जणांना स्वाईन फ्लूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number