हुतात्मा पतीला पत्नीचा अनोखा सलाम….शहीद जवानाच्या पत्नीचा लष्करात प्रवेश.

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा   शहीद कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक या लष्करात रुजू होणार आहेत. 17 नोव्हेंबर 2015 रोजी साताऱ्याचे कर्नल संतोष महाडिक हे जम्मू- काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात शत्रूशी लढताना शहीद झाले होते.   पतीच्या अंत्यसंस्कारावेळीच स्वाती यांनी निर्धार केला की आपण स्वत: आणि मुलं आर्मीतच जाणार आणि संतोष महाडिक यांचे अपूर्ण स्वप्न […]

हुतात्मा पतीला पत्नीचा अनोखा सलाम….शहीद जवानाच्या पत्नीचा लष्करात प्रवेश.

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

शहीद कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक या लष्करात रुजू होणार आहेत.

17 नोव्हेंबर 2015 रोजी साताऱ्याचे कर्नल संतोष महाडिक हे जम्मू- काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात शत्रूशी लढताना शहीद झाले होते.

 

पतीच्या अंत्यसंस्कारावेळीच स्वाती यांनी निर्धार केला की आपण स्वत: आणि मुलं आर्मीतच जाणार आणि संतोष महाडिक यांचे अपूर्ण स्वप्न पुर्ण करणार.

त्यानंतर 35 व्या वयाच्या असतानाही स्वाती महाडिकांनी स्टाफ सिलेक्शनची परीक्षा उत्तीर्ण केली आणि 11 महिन्यांचे खडतर लष्करी प्रशिक्षणही पूर्ण केले.

 

काही महिन्यांच्या कसून तयारीनंतर आता स्वाती महाडिक दहशतवाहाशी दोन हात करायला सज्ज झाल्या आहेत. 

त्या लेफ्टनंटपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number