वृत्तसंस्था, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले व मंत्रिपदाची लॉटरी लागलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘तीन तलाक’वरून वादग्रस्त वक्तव्य केलं.
‘आपली वासना शमविण्यासाठीच मुस्लिम पुरुष तीन तलाक देऊन सतत बायका बदलत असतात,’ असं त्यांनी म्हटलं. ‘तीन तलाकाच्या मुद्द्यावर भाजप मुस्लिम महिलांसोबत आहे’, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
उत्तर प्रदेशातील बस्ती येथे एका कार्यक्रमात बोलताना मौर्य यांनी हे वादग्रस्त विधान केलं. ‘मुस्लिम लोक विनाकारण आणि मनमानीपणे मनाला वाटेल तेव्हा त्यांच्या पत्नीला तलाक देतात.
तलाक देऊन ते एकप्रकारे आपली वासनाच शमविण्याचे काम करतात. याच तलाकामुळे त्यांच्या पत्नी आणि मुलांना रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येते,’ असंही ते म्हणाले.