त्र्यंबकेश्वरात साधूचा संशयास्पद मृत्यू; साधूला एका व्यक्तीकडून मारहाण

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधूचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या साधूला एका व्यक्तीकडून मारहाण करण्यात आली. साधूला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

त्र्यंबकेश्वरात साधूचा संशयास्पद मृत्यू; साधूला एका व्यक्तीकडून मारहाण

नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधूचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या साधूला एका व्यक्तीकडून मारहाण करण्यात आली. साधूला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

साधूच्या वेशात असलेल्या एका व्यक्तीचा त्र्यंबकेश्वरमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. या साधूला एका इस्माकडून मारहाण करण्यात आली. मारहाण करतानाचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीकडून साधूला मारहाण झाल्याचा आरोप त्र्यंबकेश्वरमधील आखाडाच्या महंतांनी केला आहे. मात्र या साधुचा मृत्यू कशामुळे झाला याबत मात्र अद्याप स्पष्टता नाही. 

हेही वाचा : मराठा आरक्षणाचा अहवाल बेकायदा;ओबीसी नेत्यांच्या आरोपामुळे खळबळ

त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूचा मृत्यू झाला. मद्यधुंद व्यक्तीने साधूला मारहाण केली. या मारहाणीत साधूचा जीव गेला. प्रभाकर घोटे नामक साधूचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये दारु बंदी करण्याची  मागणी आखाडा परिषदेने केली आहे. दारुमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये आलेल्या भाविकांना देखील त्रास होतो. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. तसेच या प्रकरणी अधिकचा तपास पोलीस करत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number