नव्वदीच्या दशकातलं ‘दिलबर-दिलबर’ हे गाणं फारच लोकप्रिय ठरलं. यात बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि संजय कपूर या दोघांवर हे गाणं चित्रित करण्यात आले होते. हे गाणं अलका याज्ञिक आणि विनोद राठोडने आपल्या आवाजात गायलं होतं.
आता तब्बल 20 वर्षांनंतर या गाण्याचा रिमिक्स करण्यात आला. ‘सत्यमेव जयते चित्रपटात’ दिलबर या गाण्यावर अभिनेत्री नोरा फतेही आपल्या नव्या अंदाजात नाचलीय. नोराच्या डान्स बद्दल सुष्मिताने तिचे कौतक केलं आणि दिलबरचे रिमिक्स वर्जनही फार आवडले. याच गाण्याचा रिमिक्स पाहून सुष्मिता सेनही आपल्याच गाण्यावर एका वेगळ्या अंदाजात थिरकली आहे.
With all my love!!! #dilbar #reloaded #superfun ????? pic.twitter.com/t2Lt9TdvBL — sushmita sen (@thesushmitasen) September 8, 2018
नुकताच सुष्मिताने तिचा व्हिडोओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यात सुष्मिताने ‘दिलबर-दिलबर’ या रिमिक्स गाण्यावर वर बॅले स्टाईलने नाचलीय आजही तीचा फिटनेस जाणवतो. तिचं नृत्य लोकांनाही खूप पसंतीस पडलय.