भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. स्वराज यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निष्पन्न झाले. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे अतिशय उत्तमरित्या सांभाळली.
सुषमा स्वराज्य यांची राजकिय कारकिर्द
– 2014 ते 2019 – परराष्ट्र मंत्री
– मे 2014 ते जानेवारी 2016 – परराष्ट्र व्यवहार मंत्री
– 2009 – 2014 – लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या
– जानेवारी 2003- मे 2004 – संसदीय कामकाजमंत्री
– जानेवारी 2003- मे 2004 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
-सप्टेंबर 2000 – जानेवारी 2003 – माहिती आणि प्रसारण मंत्री
-ऑक्टोबर 1998 – डिसेंबर 1998 – दिल्लीच्या मुख्यमंत्री
– 1977 – 1982 हरियाणा विधानसभेत आमदार
– वयाच्या 25 व्या वर्षी अंबाला कँटोन्मेंट मतदारसंघातून विजय
-1987 – 1990 विधानसभेवर निवडून गेल्या
– जुलै 1977, देवीलाल सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रीपदी
-1979 हरियाणाच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची अवघ्या 27 व्या वर्षी वर्णी
– हरियाणात शिक्षणमंत्री पदही भूषवलं
– केंद्रात झटपट कामासाठी ओळख बनली
– परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सभेतील भाषण , पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेत सुरळीतता आणली
– केवळ फक्त एका ट्वीटवर अनेकांना मदत केली
– मृत्यूपूर्वी 3 तास आधी 370 रद्द केल्यानंतर अभिनंदनाचं ट्विट केलेलं