जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी राम नाथ कोविंद यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता काँग्रेसही राष्ट्रपतीपदासाठी दलित चेहरा देण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसंच माजी लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांची नावं चर्चेत आहेत. भाजपनं दलित चेहरा दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार तसंच जदयूचे नेते शरद यादव यांची पिछेहाट झाल्याचं बोललं जात आहे.
भाजप एनडीएने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. त्यामुळे आता 18 विरोक्षी पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील असे संकेत विरोधी पक्षनेते गुलाब नबी
आझाद यांनी दिले आहेत.
22 जूनला दिल्ली होणाऱ्या बैठकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.