अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये आपलं पदार्पण करत आहेत. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता नवाब सैफ अली खान आणि अम़ृता सिंगची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिचा डेब्यू चित्रपट ‘केदारनाथ’चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये सारासोबत सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
बऱ्याच दिवसांपासून ही चर्चा होती की सारा अली खान बॉलिवूडमध्ये आपलं नशिब आजमावण्यासाठी सज्ज झालीय. पण बऱ्याच अडचणींवर मात केल्यानंतर अखेर साराच्या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘केदारनाथ’ या चित्रपटात एक अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. चित्रपटात 2013 ला उत्तराखंडमध्ये आलेल्या महापूराचा संदर्भ या प्रेमकथेला देण्य़ात आला आहे. त्याचबरोबर सारा आणि सुशांत या महापूरात कसे अडकतात तसेच त्यांची प्रेम कहाणी वेगळ्या अंदाजात दाखवली आहे.