वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीसोबतच्या पाकिस्तानातील भेटीसंदर्भात गुरूवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत निवेदन दिलंय. यावेळी सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केलीये.
कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईला पाकिस्तानात अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. पाकिस्तानने जाधव कुटुंबांच्या मानवधिकाराचे उल्लंघन केले असा आरोप सुषमा स्वराज यांनी केलाय.
पाकिस्तानने त्यांच्या देशातील प्रसारमाध्यमांना जाधव कुटुंबाला त्रास देण्याची संधी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय.
पाकने भेटीदरम्यान नियमांचे उल्लघंन केलं.जाधव कुटुंबीयांना मराठी बोलू दिलं नाही. ‘दोघींचे सौभाग्यालंकार उतरवले तेव्हा जाधव यांनी वडिलांची चौकशी केली. सुरक्षेच्या नावाखाली कपडे बदलले. जाधव यांच्या आईला साडीऐवजी ड्रेस घालायला लावला.
मानवता आणि सद्भावनेच्या आधारे भेटीची परवानगी दिल्याचं सांगणाऱ्या पाकने मानवताही दाखवली नाही आणि सद्भावनाही असंही सुषमा स्वराज म्हणाल्या.