बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण ‘पेटलं’

राज्य सरकारने रत्नागिरीतील बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची घोषणा केली. तेव्हापासून इथल्या ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे.या प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी सर्वेक्षणाच्या जागेवर ठिय्या आंदोलन सुरु केले. राजापूर तालुक्यातील तहसिलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनीही स्थानिकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण प्रकल्प हद्दपार होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलक ग्रामस्थांनी घेतली आहे. बारसू-सोलगावमधील आंदोलनाचा आजचा […]

बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण ‘पेटलं’

राज्य सरकारने रत्नागिरीतील बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची घोषणा केली. तेव्हापासून इथल्या ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे.या प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी सर्वेक्षणाच्या जागेवर ठिय्या आंदोलन सुरु केले. राजापूर तालुक्यातील तहसिलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनीही स्थानिकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण प्रकल्प हद्दपार होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलक ग्रामस्थांनी घेतली आहे. बारसू-सोलगावमधील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस, 2 अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह अठराशे पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहे.

पण दुसरीकडे, प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी शेकडो अधिकारी आणि 1800 पोलीस कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे.इतकेच नव्हे तर,एसआरपीएफ’च्या तीन तुकड्या देखील आज रत्नागिरीत दाखल होणार आहेत. रत्नागिरीसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून अधिक पोलिसांचे पथके बोलवण्यात आली आहेत.पोलिसांच्या चोख बंदोबस्तात रिफायनरीचे ड्रोन सर्वेक्षण व माती परीक्षण केले जाईल.

बारसू, सोलगावसह आसपासच्या परिसरात जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. रिफायनरी विरोधकांच्या प्रमुख नेत्यांना तालुका बंदी करण्यात आली आहे. गावागावातील काही प्रमुख घरांवर पोलिसांनी नोटीस लावल्या आहेत. तर दुसरीकडे कोकणातील रिफायनरी विरोधक आंदोलनावर ठाम आहेत कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज दिल्यानंतर देखील स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान काल काही नागरिकांना घरी पाठवण्यात आलं मात्र ज्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे, ती जागा मात्र आंदोकांनी सोडली नाही. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number