मुंबई, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या जयंती निमित्त मुंबईत पक्षाच्या कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही आर. आर. पाटील यांच्या विषयीच्या आठवणी सांगितल्या. बोलत असताना सुप्रिया सुळे भावुक झाल्या.
तळागाळातून वर आलेले नेते अशी आर. आर. पाटील यांची ओळख होती. त्यांना अनेकजण आबा पाटील या नावाने ओळखत होते. जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ही सर्व पदे त्यांनी भूषवली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा व संसदरत्न, माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. यावेळी… pic.twitter.com/HdjzFbocAp — Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 16, 2023
आबांचे पक्षबांधणीत मोठे योगदान होते. कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जोडलेली होती. आबांचे कार्य आता त्यांचा मुलगा रोहित पाटील पुढे नेत होता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आबांच्या आठवणींना उजाळा देताना सुप्रिया सुळे भावुक झाल्या.