सुप्रिया गट सरसावला

मुंबई, 3 मे २०२३, प्रतिनिधी :राष्ट्रवादीचे करता धरता असणाऱ्या शरद परर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. अनेक राजकीय विश्लेषकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून आता या अध्यक्षपदाची धुरा सुप्रिया यांच्याकडे जाणार असल्याचे समोर येत आहे. तसेच विविध नेत्यांकडून नेतृत्वासाठी सुप्रिया सुळेंचे नाव पुढे आले आहे.सुप्रिया सुळे यांना राजकारणात स्थापित करण्याकडे […]

सुप्रिया गट सरसावला

मुंबई, 3 मे २०२३, प्रतिनिधी :राष्ट्रवादीचे करता धरता असणाऱ्या शरद परर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. अनेक राजकीय विश्लेषकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून आता या अध्यक्षपदाची धुरा सुप्रिया यांच्याकडे जाणार असल्याचे समोर येत आहे. तसेच विविध नेत्यांकडून नेतृत्वासाठी सुप्रिया सुळेंचे नाव पुढे आले आहे.सुप्रिया सुळे यांना राजकारणात स्थापित करण्याकडे पवारांचा आधीपासूनच कटाक्ष होता.

पवारांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया घडत गेल्या आणि राजकारणात स्वतःचे वेगळे अस्तित्व त्यांनी निर्माण केले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदाची नवी जबाबदारी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीतील सध्याच्या अध्यक्षपदाचा चेहरा मोहरा असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या गटात जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे – पाटील, जितेंद्र आव्हाड हे त्यांचे समर्थक आहेत. एकंदरीत सुप्रिया सुळे यांचे पारडे जड असल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे आता अध्यक्षपद सुप्रिया सुळे यांच्याकडे जातोय का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number