‘अयोध्या’ प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवारीत निश्चित करण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. यानंतर या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यात यावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. अयोध्या प्रकरणाची सुनावणी […]

‘अयोध्या’ प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवारीत निश्चित करण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

यानंतर या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यात यावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी करणारी याचिका अखिल भारत हिंदू महासभेनं दाखल केली होती.

या प्रकरणाची सुनावणी तातडीने होणं गरजेचं असल्याचे महासभेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. मात्र त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. या प्रकरणात आपण आधीच आदेश दिलेले आहेत, असं म्हणत न्यायालयाने महासभेची याचिका फेटाळून लावली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number