परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; पुढील सुनावणी ११ जानेवारीला

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी होणार आहे. परमबीर सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई न करता प्रकरणाचा तपास सुरू राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना […]

परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; पुढील सुनावणी ११ जानेवारीला

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी होणार आहे. परमबीर सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई न करता प्रकरणाचा तपास सुरू राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना राज्य सरकारने निलंबित केले आहे. परमबीर सिंह यांना अटक न करण्याच्या मुदतीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना दिलासा दिला आहे. परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश कायम असून याप्रकरणी पुढील सुनावणी ११ जोनेवारी रोजी होणार आहे.

परमबीर सिंह यांच्यावर खंडणीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई आणि ठाण्यात परमबीर सिंह यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण दिले असून त्यांच्यावर कारवाई न करता याप्रकरणी पुढील तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number