देशप्रेम सिद्ध करण्यासाठी उभं राहण्याची काय गरज? राष्ट्रगीताच्या अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं रोखठोक मत

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी नागरिकांना चित्रपटगृहांमध्ये उभे राहण्याची गरज नाही, असं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलंय. राष्ट्रगीताचा अवमान होतोय तर चित्रपटगृहांत टी-शर्ट, शॉर्टस् घालून येण्यावरही बंदी घालाल का ? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयानं याबाबतच्या निर्णयात बदल करण्याचा सल्ला दिलाय. 1 डिसेंबर, 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयानेच दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आता सरन्यायाधीश दीपक […]

देशप्रेम सिद्ध करण्यासाठी उभं राहण्याची काय गरज? राष्ट्रगीताच्या अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं रोखठोक मत

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी नागरिकांना चित्रपटगृहांमध्ये उभे राहण्याची गरज नाही, असं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलंय. राष्ट्रगीताचा अवमान होतोय तर चित्रपटगृहांत टी-शर्ट, शॉर्टस् घालून येण्यावरही बंदी घालाल का ? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयानं याबाबतच्या निर्णयात बदल करण्याचा सल्ला दिलाय.

1 डिसेंबर, 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयानेच दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आता सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय.

निखळ मनोरंजनासाठीच नागरिक चित्रपटगृहांत जातात. देशप्रेम सिद्ध करण्यासाठी त्यांना उभं राहण्याची गरज नाही. असे सांगत ‘आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला गोळी चालवू देणार नाही’, असेही खंडपीठाने केंद्र सरकारला सुनवलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number