नागपूरात 8 वर्षापासून अंगात देवी येते म्हणून पैसे घेणाऱ्या तीस वर्षीय युवतीचा पर्दापाश

नागपूर जिल्ह्यातील शेडेश्वर येथे एका भोंदूगिरी करणाऱ्या युवतीचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दापाश केला आहे. दुर्गा किन्नाके असं या तीस वर्षीय युवतीचं नाव आहे. ती स्वत:ला दुर्गेचा अवतार समजत असून गेले आठ वर्ष अंगात देवी येत असल्याचे सांगत घरी दरबार भरवित होती. यामुळे परिसरात अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत आहेत. नेमकं प्रकरण काय? नागपूर जिल्ह्यातील शेडेश्वर येथे […]

नागपूरात 8 वर्षापासून अंगात देवी येते म्हणून पैसे घेणाऱ्या तीस वर्षीय युवतीचा पर्दापाश

नागपूर जिल्ह्यातील शेडेश्वर येथे एका भोंदूगिरी करणाऱ्या युवतीचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दापाश केला आहे. दुर्गा किन्नाके असं या तीस वर्षीय युवतीचं नाव आहे. ती स्वत:ला दुर्गेचा अवतार समजत असून गेले आठ वर्ष अंगात देवी येत असल्याचे सांगत घरी दरबार भरवित होती. यामुळे परिसरात अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नागपूर जिल्ह्यातील शेडेश्वर येथे एक तीस वर्षीय मुलगी स्वत:ला देवीचा अवतार समजत असून अंधश्रद्धा पसरवण्याच काम करत होती.

दुर्गा किन्नाके असं या युवतीचं नाव असून ती गेले आठ वर्ष देवी अंगात येते असं सांगून घरी दरबार भरवित होती.

दुर्गाचे लग्न झाले नसून ती दरबारात लग्न झालेल्या जोडप्यांना मुल होण्यासाठी धागे-दोरे देत होती.

तसेच प्रकुती ठीक नसलेल्या लोकांना लिंबू व धागा देवून पैशाची मागणी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हा प्रकार बुटीबोरी येथील तेजस मोहिते हे प्रकृती ठीक नसल्याने तो देवीच्या दरबारात गेले असता त्यांच्यासोबत हा प्रकार झाला.

भोंदूगिरी करणाऱ्या देवीन उपचाराच्या नावावर अंगारा दिला व दहा हजार रुपयांची मागणी केली तेजस याने लगेच अनिस च्या कार्यकर्त्याशी संपर्क करत पोलिसात तक्रार केली.

पोलिसांनी धाड. टाकून भोंदूगिरी करणाऱ्या युवतीला गजाआड केले व जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवत युवतीला अटक केली .

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number