दिल्लीतील आंदोलक कुस्तीटूंना किसान सभेचा पाठिंबा

मुंबई, ८ मे २०२३, प्रतिनिधी : लैंगिक शोषणाच्या प्रकरणात काही दिवसांपासून कुस्तीपटूंचे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास आता संयुक्त किसान मोर्चाने पाठिंबा दिला असून त्यांच्या समर्थनार्थ दिल्लीसह देशव्यापी निदर्शने करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर रविवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरक्षा वाढवण्यात आली. मागील वर्षभर दिल्लीत झालेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त किसान […]

दिल्लीतील आंदोलक कुस्तीटूंना किसान सभेचा पाठिंबा

मुंबई, ८ मे २०२३, प्रतिनिधी : लैंगिक शोषणाच्या प्रकरणात काही दिवसांपासून कुस्तीपटूंचे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास आता संयुक्त किसान मोर्चाने पाठिंबा दिला असून त्यांच्या समर्थनार्थ दिल्लीसह देशव्यापी निदर्शने करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर रविवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरक्षा वाढवण्यात आली.

मागील वर्षभर दिल्लीत झालेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चाने केले होते. आता हे कायदे केंद्र सरकारने रद्द केले आहेत.महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांना अटक करावी. तसेच त्यांची पदावरून हकालपट्टी करावी या मागणीसाठी कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर १५ दिवसांपासून निदर्शने करत आहेत.

शनिवारी SKM च्या निवेदनानुसार, 7 मे रोजी पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील संघटनेचे अनेक नेते जंतरमंतर येथील आंदोलनस्थळाला भेट देऊन कुस्तीपटूंना पाठिंबा दिला. त्यापूर्वी हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी जंतरमंतरजवळ आंदोलक कुस्तीपटूंना पाठिंबा दिला. एएनआयशी बोलताना अनिल विज यांनी म्हणाले की, आमचा कुस्तीपटूंच्या आंदोलनास पाठिंबा आहे.

आतंरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मल्लिक यांनी जानेवारी महिन्यामध्ये रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकरे यांनी या आरोपांची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापन केली होती. बुधवारी, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष पीटी उषा यांनी जंतरमंतर येथे आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेतली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number