सुशिक्षित लोक अंधश्रद्धाळू नसतात, या समजाला सुरूंग लावणारा प्रकार अकोला येथे झाला आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारा शिक्षकच पैशाचा पाऊस पडावा, यासाठी चक्क नरबळी द्यायला निगाला होता. कोट्यवधी रुपयांच्या पाऊस पाडण्यासाठी 25 ते 30 वयोगटातील मुंजाच्या म्हणजेच अविवाहित व्यक्तीच्या शोधात असणाऱ्या या शिक्षकाविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर राजाराम सोळंके असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे.
सुधाकर सोळंके हा शिवाजी विद्यालयात शिक्षक आहे. बुधवारी शिवाजी सोळंके याने संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता असलेल्या रोशन भटकर यांच्या मोबाईलवर फोन केला आणि आपल्याला पंचवीस ते तीस वयोगटातील अविवाहित युवक हवा असल्याची मागणी त्याने केली. आपण त्याला वाशिम जिल्ह्यातील धनज येथील एका मांत्रिकाकडे घेऊन जाऊ आणि त्याबदल्यात आपल्या दोघांना एक- एक कोटी रुपये शकतात, असं आमिष दाखवलं. तसंच अविवाहित यूवकालाही 50 लाख रुपये देऊ, असं आश्वासन दिलं.
मात्र ही बाब रोशन भटकर याने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक पुरुषोत्तम आवारे यांना सांगितल्यानंतर ते खदान पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांना शिक्षक सुधाकर सोळंके याने मोबाईलवरून केलेलं सारं संभाषण ऐकवलं. नरबळी देण्याचा हा प्रयत्न असल्याने पोलिसांनीसुद्धा तातडीने शिक्षक सुधाकर सोळंके याला त्याच्या खडकी येथील घरून ताब्यात घेतले. त्याच्यासह इतर तीन साथीदाराविरुद्ध पुरुषोत्तम आवारे यांच्या तक्रारीवरून अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा कायदा 3, 1, 2 नुसार गुन्हा दाखल केला,