सनी लिऑनी ठरली मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी

बॉलिवूड सेन्सेशन सनी लिओनी फेसबुकवर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी ठरली आहे. ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या चार्ट’नुसार, फेसबुकवर सनीला सर्वाधिक सर्च केलं जातं.   इतर बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकत सनी 100 गुणांसह सर्वाधिक चर्चित फेसबुक सेलिब्रिटी बनली आहे. ‘सुई धागा’ फेम अनुष्का शर्मा 90 गुणांसह या यादीत दुस-या स्थानावर आहे. तर माधुरी दीक्षित 86 गुणांसह तिस-या, प्रियांका चोप्रा 84 गुणांसह […]

सनी लिऑनी ठरली मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी

बॉलिवूड सेन्सेशन सनी लिओनी फेसबुकवर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी ठरली आहे. ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या चार्ट’नुसार, फेसबुकवर सनीला सर्वाधिक सर्च केलं जातं.  

इतर बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकत सनी 100 गुणांसह सर्वाधिक चर्चित फेसबुक सेलिब्रिटी बनली आहे. ‘सुई धागा’ फेम अनुष्का शर्मा 90 गुणांसह या यादीत दुस-या स्थानावर आहे. तर माधुरी दीक्षित 86 गुणांसह तिस-या, प्रियांका चोप्रा 84 गुणांसह चौथ्या आणि जॅकलिन फर्नांडिस 83 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.  

अमेरिकेच्या ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’ या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणाले की, “गेल्या काही दिवसांमध्ये ‘करनजीत कौर’ या वेबसीरिजीमुळे सनीची लोकप्रियता खूप वाढली. त्यातच तिचा रणविजयसोबत स्प्लिस्टविला सिझन 11 हा शो देखील सुरू झाला.  त्यामुळे सनीची डिजिटल माध्यमांमध्ये लोकप्रियता खूप वाढली. ती फेसबुकवर सर्वाधिक सर्च होऊ लागली. फेसबुकवर तिच्याविषयी पोस्ट आणि रिपोस्ट झाल्या.”
 sunny1.jpgअश्वनी कौल यांनी सांगितले की, “14 भारतीय भाषांमधील 600 हुन अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number