लेकाच्या लग्नानंतर सनीने घेतली नवी गाडी

मुंबई, २२ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी सुरु आहेत. काही कलाकारांनी आपले लग्न उरकून घेतले तर काही सुट्टीसाठी परदेशात गेले. अलीकडेच अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल याचा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. त्यामुळे देओल कुटुंब बराच वेळ चर्चेत होते. दरम्यान आता सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आलाय. ते म्हणजे त्याच्या घरी […]

लेकाच्या लग्नानंतर सनीने घेतली नवी गाडी

मुंबई, २२ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी सुरु आहेत. काही कलाकारांनी आपले लग्न उरकून घेतले तर काही सुट्टीसाठी परदेशात गेले. अलीकडेच अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल याचा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. त्यामुळे देओल कुटुंब बराच वेळ चर्चेत होते. दरम्यान आता सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आलाय. ते म्हणजे त्याच्या घरी आणखी एका नव्या पाहुण्याचं आगमन झाले आहे.

अभिनेता सनी देओल याच्या मुलाचा, करण देओलचा विकाऊ सोहळा नुकताच पार पडला. त्यामुळे कुटुंबात द्रिशा आचार्य हिचं सून म्हणून आगमन झालं आहे. त्यापाठोपाठ आणखी एका सदस्याचंही कुटुंबात आगमन झालं आहे. सनी देओल आणि धर्मेंद्र यांनी एक आलिशान गाडी विकत घेतली आहे. या दोघांचे या गाडीसोबतचे फोटो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram
A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)


सनी देओल आणि धर्मेंद्र यांनी पोर्शे 911GT4 ही महागडी गाडी खरेदी आहे. या गाडीची किंमत सुमारे ३ कोटी रुपये इतकी आहे. या गाडीसोबत सनी देओल आणि धर्मेद्र यांचे या गाडीसोबतचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number