Homeमहाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात मोठे फेरबदल होणार सुनील तटकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात मोठे फेरबदल होणार- सुनील तटकरेंची माहिती
जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल केले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोल्हापुरात दिली. युवक, युवती आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे फेरबदल होणार असल्याचे त्यांनी सांगितलं. 10 जुनचा वर्धापन दिन शेतकऱ्यांना समर्पित करणार असून शेतकऱ्यांच्या मागणीची सनद प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात येणार असल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली. तर राजू […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल केले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोल्हापुरात दिली. युवक, युवती आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे फेरबदल होणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
10 जुनचा वर्धापन दिन शेतकऱ्यांना समर्पित करणार असून शेतकऱ्यांच्या मागणीची सनद प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात येणार असल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली. तर राजू शेट्टींची संघर्ष यात्रा ही शेतकऱ्यांसाठी नसून त्यांना उपरती झाली म्हणून यात्रा काढली असल्याची टीकाही तटकरेंनी केली.