Jay Pawar: सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पार्थनंतर जयच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या पदावरील तटकरे आणि पटेल यांचा पत्रात उल्लेखच नाही

राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पार्थ पवार यांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती केल्यानंतर आता जय पवार यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Jay Pawar: सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पार्थनंतर जयच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या पदावरील तटकरे आणि पटेल यांचा पत्रात उल्लेखच नाही

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. या दु:खातून सावरत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पक्षाला सावरलं. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वतःवर घेतली. ही जबाबदारी घेतल्यापासून त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेतले आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच सुनेत्रा पवारांनी मोठी भूमिका बजावली आहे. अशातच राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा- Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय; सिंचन योजना, नदी पुनरुज्जीवन आणि विद्यार्थ्यांसाठी घोषणांचा पाऊस

पार्थ पवार यांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती केल्यानंतर आता जय पवार यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी जय पवारांचा पक्षाच्या कोणत्याही जबाबदारीसाठी हातभार लागलेला नाही. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येत आहे. त्यामुळे आता एकीकडे पार्थ पवार राज्यसभेत खासदार होऊन पक्षाची बाजू मांडतील तर जय पवार पक्ष संघटनेत काम करतील. यावेळी फक्त जय पवार एकटे नसून त्यांच्यासोबत इतर देखील काही नेते सोबत असणार आहेत. जय पवार यांच्यासोबत सना मलिक, सरोज अहिरे, शेखर निकम आणि चेतन तुपे यांचा देखील राष्ट्रीय कार्यकारीणीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता पहिल्यांदाच राष्ट्रवादी अजित पवार पक्षात तरुण कार्यकारिणी सदस्यांना संधी दिली आाहे.

हेही वाचा- Ashok Kharat Case : महाराष्ट्रात खळबळ! अजित पवार यांच्या फोटोंवर फुल्या अन् रक्ताचे डाग?; सुषमा अंधारेंनी व्यक्त केला ‘अघोरी विद्ये’चा संशय
असं असताना सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला 26 फेब्रुवारीला पाठवलेलं पत्र समोर आलं आहे. यात सुनेत्रा पवार यांच्याशिवाय फक्त शिवाजीराव गरजे यांचा खजिनदार म्हणून उल्लेख आहे. तर सुनेत्रा पवारांकडून फक्त 14 पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. तर संघटनात्मक निवडणूक रचना म्हणून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, शेखर निकम, सुबोध मोहिते, सरोज अहिरे, जय पवार आणि धीरज शर्मा यांचा उल्लेख केला आहे. महत्त्वाचं म्हणजे, प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांचा उल्लेख यात करण्यात आला नाही तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांचाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख नाही. 

हेही वाचा- Aditi Tatkare On NCP Merger: ‘वहिनींच्या नेतृत्वाचा विचार का झाला नाही?’ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आदिती तटकरेंचा शरद पवार गटाला सवाल

सुनेत्रा पवार यांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. त्या पत्रातून सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीतील इतर नेत्यांना सूचक इशारा दिला असल्याचे पाहायला मिळत आहे. ’28 जानेवारीनंतर निवडणूक आयोगाशी झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार वैध धरु नये, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून यापुढे मी जो पत्रव्यवहार करेन तोच वैध धरावा’ अशी मागणी सुनेत्रा पवार यांनी पत्रात नमूद केली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number