Sunetra Pawar: महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विधान परिषदेत महत्त्वाची घोषणा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या.

Sunetra Pawar: महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विधान परिषदेत महत्त्वाची घोषणा

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत आज महिलांसाठी अनेक दिलासादायक घोषणांचा पाऊस पाडला. आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या कामकाजाशी संबंधित प्रश्नांवर भर दिला आणि त्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी विशेष योजना सादर केल्या.सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ ही योजना लागू केली जाईल. याअंतर्गत, महिला सकाळी 9.15 ते 9.45 या वेळेत ऑफिसमध्ये लवकर येतील, तर तितकाच वेळ संध्याकाळी आधी घरी निघण्याची मुभा मिळेल. ही सुविधा जास्तीत जास्त 30 मिनिटांपर्यंत लागू राहणार आहे. यामुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे आणि रस्त्यांवरील गर्दीतून महिलांना आरामदायक प्रवासाची संधी मिळणार आहे.

तसेच, सुनेत्रा पवार यांनी शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेसाठी मोठी घोषणा केली. राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची (सहा महिने) प्रसूती रजा मिळेल. याशिवाय, प्रसूतीनंतर गरज असल्यास 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतन रजा घेण्याची सुविधाही पुरवली जाईल. सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की, महिलांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये समतोल साधता यावा, आणि त्यांच्यासाठी कार्यस्थळी सुविधा वाढवणे ही सरकारची प्राथमिकता आहे. या निर्णयामुळे महिलांना त्यांच्या कामकाजात अधिक सुलभता मिळणार असून, मुंबईतील पीक अवरमध्ये गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे.या घोषणांनी महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उफाळून आली असून, कार्यक्षेत्रात महिलांसाठी ऐतिहासिक पाऊल म्हणून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number