उद्या सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत लोकल सेवेच्या मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई रविवार 11 मार्च रोजी सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत लोकल सेवेच्या मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहेत. सोमवार 12 मार्चच्या मध्यरात्री घाटकोपर इथे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत ब्लॉक आहे. रविवारी रत्नागिरी-दादर पॅसेंजरला दादरऐवजी दिवा स्थानकात अंतिम […]

उद्या सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत लोकल सेवेच्या मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रविवार 11 मार्च रोजी सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत लोकल सेवेच्या मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहेत. सोमवार 12 मार्चच्या मध्यरात्री घाटकोपर इथे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत ब्लॉक आहे.

रविवारी रत्नागिरी-दादर पॅसेंजरला दादरऐवजी दिवा स्थानकात अंतिम थांबा राहील. दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातूनच सुटेल. दिवा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांच्या सुविधेसाठी दादरहून दु. 3.40 वाजता विशेष लोकल सोडण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 आणि चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक आहे.

सीएसएमटी/वडाळ्याहून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 पर्यंत आणि सीएसएमटी ते वांद्रे/अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 पर्यंत बंद राहणार आहे. अप हार्बर मार्गावर पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी सेवा सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 आणि वांद्रे/अंधेरी लोकल सेवा सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.09 पर्यंत बंद राहील. या कालावधीत पनवेल आणि कुर्लाहून विशेष फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.

सोमवार, 12 मार्च रोजी मध्यरात्री 12.45 ते पहाटे 5.55 पर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे एलटीटी-अलाहाबाद एक्स्प्रेस पहाटे 5.23 ऐवजी सकाळी 6 वाजता सुटेल. एलटीटी-मुझफ्फराबाद एक्स्प्रेस दुपारी 12.15 ऐवजी दुपारी 2.20 वाजता सुटेल. शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस पहाटे 4.50 ऐवजी सकाळी 7 वाजता येईल. शालिमार-एलटीटी पहाटे 5.50 ऐवजी सकाळी 7.30 वाजता येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number