मुंबईत शिवसेना नगरसेवकाची चाकूने वार करुन हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कांदिवलीतील समतानगरचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्यावर रविवारी रात्री काही अज्ञात गुंडानी हल्ला केला. या हल्ल्यात गुंडांनी त्यांच्यावर चाकूने वार केले व त्यातच त्यानी आपला जीव गमावला. राहत्या घराजवळच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात एकचं खळबळ उडालीय. पोलिसुकडून मिळालेल्या माहिती नुसार,रविवारी रात्री अशोक सावंत आपल्या मित्रांना भेटून […]

मुंबईत शिवसेना नगरसेवकाची चाकूने वार करुन हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कांदिवलीतील समतानगरचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्यावर रविवारी रात्री काही अज्ञात गुंडानी हल्ला केला. या हल्ल्यात गुंडांनी त्यांच्यावर चाकूने वार केले व त्यातच त्यानी आपला जीव गमावला.

राहत्या घराजवळच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात एकचं खळबळ उडालीय.

पोलिसुकडून मिळालेल्या माहिती नुसार,रविवारी रात्री अशोक सावंत आपल्या मित्रांना भेटून घरी परतत होते त्याचवेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. समतानगरमधील त्यांच्या राहत्या इमारतीखाली हे हल्लेखोर गाडीत लपून बसले होते.

सावंत इमारतीखाली पोहोचताच या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि त्यांच्यावर चाकूने वार केले. हल्ला झाल्यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच सावंत यांचा मृत्यू झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number