मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून पश्चिम मार्गावर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नाही. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० पर्यंत घेण्यात येणार आहे. तसेच कर्जत- खोपोली दरम्यान सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/ वांद्रे डाऊन आणि अप मार्गावर असणार आहे.
मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंडदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर ब्लॉक असल्यामुळे जलद लोकलची सेवा प्रवशांसाठी उपलब्ध असेल.
तसेच विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकांवर लोकल थांबणार नाही.
कर्जत- खोपोली दरम्यान सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हार्बर मार्गवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन आणि अप मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ वडाळा रोड ते वाशी- बेलापूर- पनवेल मार्गावर गाड्या उशीराने धावतील.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून वांद्रे/ गोरेगावला जाणाऱ्या गाड्या वेळापत्रकानुसार धावणार नाही.
यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.