मुंबई, ८ जून,२०२३, प्रतिनिधी : फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकाकडे वर्धा लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुमित वानखेडे यांना वर्धा लोकसभेसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. भाजपाचे मिशन लोकसभा सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर झाले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व म्हणजे निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली […]
फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकाकडे वर्धा लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुमित वानखेडे यांना वर्धा लोकसभेसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.
भाजपाचे मिशन लोकसभा सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर झाले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व म्हणजे निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. विनय सहस्रबुद्धे, राहुल कुल, मुरलीधर मोहोळ, मंगलप्रभात लोढा,प्रसाद लाड,पराग अळवणी यांच्यासह अनेक नेत्यांची वर्णी लागली आहे. फडणवीसांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना वर्धा लोकसभेसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सुमित वानखेडेंच्या आमदारकीसाठी या हालचाली होत आहेत का ?, असा प्रश्न निर्माण होत आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.