सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

मलकापुर तालुक्यालील वाघुळ येथिल मृतक ज्योती गजानन सनीसे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली आहे’ज्योती गजानन सनीसे हि २६ वर्षीय असून हीने नायलॉन प्लास्टिकच्या दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.२६ वर्षीय महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक ज्योती हीचा विवाह १९ मे २०१७ रोजी वाघुळ […]

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

मलकापुर तालुक्यालील वाघुळ येथिल मृतक ज्योती गजानन सनीसे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली आहे’ज्योती गजानन सनीसे हि २६ वर्षीय असून हीने नायलॉन प्लास्टिकच्या दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.२६ वर्षीय महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक ज्योती हीचा विवाह १९ मे २०१७ रोजी वाघुळ येथिल गजानन दशरथ सनिसे याच्याशी झाला होता.

सासर कडून वारंवार माहेरवरून पैसे आणण्यासाठी तकादा लावत असल्याचा आरोप सासरच्या मंडळीकडे करण्यात आला आहे.यावेळी विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर हुंड्यापायी सासरच्या मंडळीने तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरकडील मंडळी कडून करण्यात आला आहे. हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय मृतकाच्या नातेवाईकाने केला आहे. मृतकाचा भाऊ सागर वानखेडे यांनी मलकापुर शहर पोलीस स्टेशनमध्ये घातपात असल्याचे तक्रार दिली आहे . मलकापूर पोलिसात सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून ५ आरोपी फरार आहेत अशी माहिती आहे . पोलीस फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत अशी माहिती मिळाली आहे. मृतक ज्योती सनीसे हिच्या शवविच्छेदनानंतर पोलीस संरक्षणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number