कर्जपायी शेतकऱ्याची आत्महत्या

५० हजार रुपयांच्या कर्जपायी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिखली तालुक्यातील भोरसा भोरसी येथे घडली. संजय रामराव गवई असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. संजय गवई यांच्याकडे एका बँकेचे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. भोरसा भोरसी शिवारात त्यांच्याकडे एक एकर शेती आहे. मात्र सततच्या नापिकीमुळे ते अडचणीत होते. दरम्यान आता पावसाची शक्यता असल्याने […]

कर्जपायी शेतकऱ्याची आत्महत्या

५० हजार रुपयांच्या कर्जपायी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिखली तालुक्यातील भोरसा भोरसी येथे घडली. संजय रामराव गवई असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. संजय गवई यांच्याकडे एका बँकेचे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. भोरसा भोरसी शिवारात त्यांच्याकडे एक एकर शेती आहे. मात्र सततच्या नापिकीमुळे ते अडचणीत होते. दरम्यान आता पावसाची शक्यता असल्याने शेतातील हरभऱ्याची सुडी झाकायला जातो असे सांगून ते शेतात गेले.

मात्र, बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने शोध घेतला असता शेतातील बाभळीच्या झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेला दिसला. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांनी आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number