आरोपीने केला जेलमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न

मुंबईतील आर्थररोड जेलमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका आरोपीने जेलमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. जेलमधील या आरोपीने त्याच्या पॅन्टच्या अल्युमिनियम बटनाला धार लावून त्याने हातावर वार केले. तसेच अंडर प‌ॅन्टच्या इलास्टिकने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न देखील त्याने केला आहे. नाज अयुब खान, असं या आरोपीचं नाव आहे. यापुर्वी या आरोपीनं पळून जाण्याचा […]

आरोपीने केला जेलमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न

मुंबईतील आर्थररोड जेलमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका आरोपीने जेलमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. जेलमधील या आरोपीने त्याच्या पॅन्टच्या अल्युमिनियम बटनाला धार लावून त्याने हातावर वार केले. तसेच अंडर प‌ॅन्टच्या इलास्टिकने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न देखील त्याने केला आहे. नाज अयुब खान, असं या आरोपीचं नाव आहे. यापुर्वी या आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

न्यायालयाने 3 डिसेंबर 2020 रोजी या आरोपीची रवानगी ही आर्थररोड जेलमध्ये केली होती. तसेच 16 एप्रिल रोजी या आरोपीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानं त्याला क्वारंटाईन केले होते. क्वारंटाईनमध्ये असतांनाही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्या या कृत्यामुळे त्याला अतिसुरक्षा विभागात ठेवण्यात आले होते. त्याला इतर यार्डात ठेवण्यात यावे म्हणून त्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे. कारागृहातील वैद्यकीय अधिकारी त्याच्यावर उपचार करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number