…तोपर्यत वेगळा विदर्भ करता येणार नाही; अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   अच्छे दीन आयेंगे असं सांगत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारनं एकही आश्वासन पुर्ण केलं नाही, भाजपा सरकार हे जुमलेबाज सरकार आहे अशी टिका विरोधक नेहमी करताने दिसतात. मात्र ज्या वेगळ्या विदर्भा भाजपा आग्रही होतं त्याच वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्यावरुन आता भाजपा मागे हटताना दिसंतय. जो पर्यत भाजपाला राज्यात बहुमत मिळत नाही तोपर्यत वेगळा […]

…तोपर्यत वेगळा विदर्भ करता येणार नाही; अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अच्छे दीन आयेंगे असं सांगत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारनं एकही आश्वासन पुर्ण केलं नाही, भाजपा सरकार हे जुमलेबाज सरकार आहे अशी टिका विरोधक नेहमी करताने दिसतात.

मात्र ज्या वेगळ्या विदर्भा भाजपा आग्रही होतं त्याच वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्यावरुन आता भाजपा मागे हटताना दिसंतय. जो पर्यत भाजपाला राज्यात बहुमत मिळत नाही तोपर्यत वेगळा विदर्भ करता येणार नाही अशी भूमिका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलीये.

भाजप वेगळ्या विदर्भासाठी सकारात्मक आहे. विधिमंडळात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर वेगळ्या विदर्भाचा निर्णय घेऊ, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. शुक्रवारी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलंय.

विदर्भाच्या मुद्द्यावर भाजप सकारात्मक असून अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना विदर्भाचे शिष्टमंडळ भेटले होते. स्वतंत्र विदर्भाचा ठराव करण्यासाठी सध्या विधिमंडळात भाजपचे बहुमत नाही. तेलंगणा राज्य निर्मिती करताना विधानसभेत ठराव करण्यात आला होता. त्यामुळे विदर्भासाठीही असा ठराव करावा लागेल, असे मुनगंटीवार म्हणाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number