जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी आज ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
जीएसटीच्या मुद्द्यावर सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी शिवसेनेच्या साथीनं केला होता.
त्यामुळे विशेष अधिवेशनात शिवसेनेनं अडचणीत भाजपला आणू नये यासाठी आतापासूनच भाजपनं कंबर कसली आहे.
मुनगंटीवारांनी सेनेचा विरोध मावळला असल्याचं सूतोवाचं केले. जीएसटी मंजूर करण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करत असल्याचं मुनगंटीवारांनी सांगितले.