2025 हा वर्ष सरून 4 दिवस झाले आहेत. असं असताना नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोने-चांदीच्या दरात विशेष बदल झालेले पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सोन्यांच्या दरात सातत्याने होणारी वाढ बघून ग्राहकांकडून सोनं खरेदी करावं की, नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशातच आज 5 जानेवारी 2026 रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीच्या दरातही मोठे फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
शहरानुसार बघायच झालं तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 126,069 रुपये आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याची किंमत 137,530 प्रति 10 ग्रॅम आहे. तर पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 126,069 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 137,530 रुपये आहे. त्याचसोबत नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 126,069 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 137,530 रुपये इतका आहे. तसेच नाशिकमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 126,069 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 137,530 रुपये आहे. देशातील सोन्याचे दर हे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 137,780 रुपये, 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 126,298 रुपये आहेत. त्याचसोबत 1 किलो चांदीचा दर 243,340 रुपये, 10 ग्रॅम चांदीचा दर 2,433 रुपये इतका आहे.