Viral Story: गेल्या एका महिन्यापासून गुगलमध्ये नोकरी मिळालेल्या एका मुलीची यशोगाथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही गोष्ट केवळ नोकरीच्या मुलाखतीची किंवा अपमानित करण्याच्या प्रयत्नाची नाही तर ती धैर्य, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाचे उदाहरण आहे. अर्पिता दास असं या मुलीचं नाव आहे. तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचा आणि त्यापूर्वी एका स्टार्टअप कंपनीत काम करण्याचा अनुभव सांगितला होता.
अर्पिताने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की, एका स्टार्टअप कंपनीच्या मुलाखतीत तिला खूप कठीण प्रश्न विचारण्यात आले होते. सिस्टम डिझाइन राउंड दरम्यान, तिला पायाभूत सुविधा डिझाइन करण्यास, सीपीयू खर्चाचा अंदाज लावण्यास सांगितले गेले. यावर अर्पिताने सांगितले की, मुलाखत घेणाऱ्याने सर्व काही करुन घेतले, फक्त डेटा सेंटरचे भौतिक बांधकाम बाकी होते. काही प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने मुलाखत घेणाऱ्याने तिला हसून म्हटले, यामुळेच तुमच्यासारखे लोक गुगल किंवा मेटा सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये कधीही येऊ करू शकत नाहीत, असं बोलून त्यांनी मर्यादाच ओलांडली असेही अर्पिताने म्हटले आहे.
Was grilled by a mid-level startup interviewer in a system design round – he made me design infra, estimate CPU costs, basically everything except physically build the data center. When I stumbled, he smirked and said, “This is why people like you won’t make it to big companies… https://t.co/fDKU3blwJS — Arpita Das (@Arpitaaa01) July 27, 2025
हेही वाचा:Nanded: इसापूर धरण परिसरात तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांनी दिला चोप
हे कोणालाही निराश करणारे ठरले असते पण तिने हार मानली नाही. अर्पिताने स्टार्टअप कंपनीचे आणि मुलाखत घेणाऱ्याचे नाव उघड केले नाही पण तिने निश्चितपणे सांगितले की तिला अखेर गुगलमध्ये नोकरी मिळाली.
यासोबतच, तिने गुगल कंपनीत नोकरी मिळाल्याचे सांगत गुगलकडून मिळालेल्या गोष्टींही सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. यामध्ये गुगल पिक्सेल मोबाईल आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे.
The final item of Google onboarding is here ?? and oh what a timing ? pic.twitter.com/gDsCGKLLKP — Arpita Das (@Arpitaaa01) August 17, 2025
अर्पिताची पोस्ट व्हायरल होताच लोकांनी तिच्या धाडसाचे आणि यशाचे कौतुक केले. एका वापरकर्त्याने लिहिले, कधीकधी मुलाखत घेणाऱ्याला सर्वात मूलभूत कौशल्येही माहित नसतात. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, मुलाखत घेणारा आता कुठे काम करत आहे? तिसऱ्या व्यक्तीने लिहिले, मला वाटते काही काळानंतर तुम्हाला भविष्यात त्या मुलाखत घेणाऱ्याची मुलाखत घेण्याची संधी मिळेल. जग असेच चालते. यासह अनेक कंमेट्स अर्पिताच्या पोस्टवर आल्या आहेत.
More things from @GoogleDeepMind came by ?? pic.twitter.com/MHFpOAk6bb — Arpita Das (@Arpitaaa01) August 11, 2025