‘फुलवंती’ची सक्सेस पार्टी

प्रेक्षकांच्या उदंड प्रेमाने हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये गाजत आहे.

‘फुलवंती’ची सक्सेस पार्टी

मुंबई : पॅनोरमा स्टुडिओज, मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 'फुलवंती' या चित्रपटाने ५० दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला असून प्रेक्षकांच्या उदंड प्रेमाने हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये गाजत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळा चित्रपट ५० दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये आपली जादू टिकवतो आणि ‘फुलवंती’ने हा विक्रम करून दाखवला आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर देखील प्रदर्शित झाला असून तिथेही 'फुलवंती'ला  भरभरून प्रतिसाद  मिळत आहे. 

या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी खास सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह अमृता खानविलकर हिने विशेष उपस्थिती दर्शवून या पार्टीला चारचांद लावले. यावेळी प्राजक्ता आणि अमृताने 'मदनमंजिरी' या जबरदस्त लावणीवर कमाल सादरीकरणही केले. या सक्सेस पार्टीत सर्वच टीमने हे यश साजरे केले.  या चित्रपटाचे संवाद, लेखन आणि दिग्दर्शन अनुक्रमे प्रवीण विठ्ठल तरडे आणि स्नेहल प्रवीण तरडे यांनी केले आहे. तर छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये सांभाळली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number