भिवापुरातील 17 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात यश

जिल्हा प्रशासनाच्या दक्षतेमुळे अक्षयतृतीय या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न रोखण्यात यश मिळाले आहे.

भिवापुरातील 17 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात यश

वर्धा: जिल्हा प्रशासनाच्या दक्षतेमुळे अक्षयतृतीय या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न रोखण्यात यश मिळाले आहे. वर्धा जिल्ह्यातील खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील एका अल्पवयीन मुलीचा नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एका तरुणाशी 5 मे रोजी विवाह निश्चित करण्यात आला होता. मात्र, महिला आणि बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे हा बालविवाह रोखण्यात आला.

हेही वाचा: सासू आणि नणंदेकडून विवाहितेचा छळ; पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली होती. बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिला आणि बालविकास विभाग, पोलिस प्रशासन आणि बाल संरक्षण अधिकारी सतर्क होते. यादरम्यान, अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली की, खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलीचे लग्न होणार आहे. या माहितीच्या आधारावर पोलीस अधिकाऱ्यांची टीम संबंधित गावात पोहोचली.

जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी मुलीच्या वयाची तपासणी केली, तेव्हा स्पष्ट झाले की ती 17 वर्षांची आहे. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी हे लग्न तात्काळ थांबवले आणि संबंधित कुटुंबांना, 'बालविवाह कायद्यानुसार गुन्हा आहे', असे कळविले. तसेच, त्यांना बालविवाह प्रतिबंधक समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number