मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची अखेर सुटका

मणिपुरमध्ये अडकलेल्या सर्व 22 मराठी विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाम आणि मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी लागेल ती सर्व मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्या मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आज दुपारपर्यत महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी […]

मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची अखेर सुटका

मणिपुरमध्ये अडकलेल्या सर्व 22 मराठी विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाम आणि मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी लागेल ती सर्व मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्या मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आज दुपारपर्यत महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी माहिती दिली आहे.

मणिपूर येथील हिंसाचारादरम्यान मणिपूरमध्ये शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी तिकडे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारची यंत्रणा अलर्ट झाली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनवरून तेथील विद्यार्थ्यांना दिलासा देत लवकरच विशेष विमान पाठवण्यात येईल असे सांगितले.

दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचारामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही एसएमएस केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली असून त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.तसेच या विद्यार्थ्यांना परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती करण्यात आली असून त्यांना तिथे सुरक्षित वातावरणात राहता येईल.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number