मुंबईत पाणी टँकर संघटनेंकडून संप पुकारण्यात आला आहे. सेंट्रल ग्राउंड वॉटर अथोरिटीच्या खालील नियमांच्या अंमलबजावणीला वॉटर टँकर संघटनेचा विरोध आहे.
मुंबईत एकूण अडीच हजार टँकर्स आहेत. याद्वारे मुंबई शहरातील अनेक विभागांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे आता संप असल्यामुळे मुंबईतील अनेक विभागांना फटका बसला आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,पाणीपुरवठा मंत्री यांची भेट मिळावी यासाठी पाणी टँकर संघटनेची चर्चा सुरू आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संपामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स आणि काही रुग्णालयांना त्यासोबतच मुंबईतील विकास कामांना फटका बसत आहे. मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर अथोरिटीच्या नियमांची अंमलबजावणी फक्त मुंबईत केली जाते. यासाठी मुंबई वॉटर टँकर संघटनेने संप पुकारला आहे. सेंट्रल ग्राउंड वॉटर अथोरिटीच्या खालील नियमांच्या अंमलबजावणीला वॉटर टँकर संघटनेचा विरोध आहे.
– वॉटर टँकर पुरवणाऱ्या मालकाकडे मुंबईत दोन हजार स्क्वेअर फिटची जागा असणे गरजेचे आहे.
– या जागेतच टँकर पाण्याने भरला जावा.
– चार पेक्षा जास्त वॉटर टँकरसाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी.
– प्रत्येक ठिकाणी टेलिस्कोपिक मीटरचा वापर करावा.
– वॉटर टँकर सुरु ठेवण्यासाठी दरवर्षी प्रशासनाला अॅडव्हान्स द्यावा लागणार, तसेच एनओसी काढावी लागणार आहे.