यंदा १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. या निमित्ताने गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. परंतु, मुंबई महानगरपालिकेतर्फे मूर्तिकारांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
या नियमावलीतील काही अटींमुळे मूर्तिकार संभ्रमात पडले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती गणपतीच्या मूर्ती या शाडूच्या मातीपासून किंवा पर्यावरण पूरक घटकांपासून बनवल्या जाव्यात अशा पद्धतीची नियमावली मुंबई महानगरपालिकेने जारी केली आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे शाडूची माती की प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) हा वाद पुन्हा एकदा रंगू लागला आहे.
दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान पीओपी चा मुद्दा हा काही नवीन विषय नाही. मूर्तिकार हे गणेशोत्सवाच्या सात-आठ महिन्या अगोदर पासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम सुरू करतात. माघी गणपती संपल्यानंतर मूर्तिकार गणेशोत्सवाच्या तयारीला लागतात. सध्याच्या वाढत्या महागाईत सर्वच गणेश भक्तांना शाडूच्या मातीच्या मूर्ती आणणे परवडणारे नसते. अशात अनेक जण पीओपी पासून तयार केलेल्या मूर्ती घेण्यात समाधान मानतात. परंतु नेहमीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या तोंडावर घरगुती गणपतीसाठी पीओपीला बंदी घातली आहे. पीओपीमुळे पर्यावरणाची हानी होते आणि या कारणास्तव सर्व घरगुती गणपती हे शाडूच्या मातीचे किंवा पर्यावरण पूरक घटकांपासून बनवलेले असावेत. त्याचबरोबर त्याची उंची जास्तीत जास्त ४ फुटापर्यंत असावी असा आदेश जारी केला आहे.
अशी आहे नियमावली