ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक निर्बंध लागू

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन विषाणूमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच महाराष्ट्रातही ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला असून ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे चार रुग्ण रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले […]

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक निर्बंध लागू

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन विषाणूमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच महाराष्ट्रातही ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला असून ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे चार रुग्ण रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले असून मुंबईकरांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी केली आहे. १६ डिसेंबरपासून मुंबईत १४४ कलम लागू होणार असून पुढील १६ दिवसांसाठी मुंबईत रॅली आणि प्रदर्शन करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. तसेच नव वर्षाच्या पार्टीसाठी परवानगी नसल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय आहेत नियम?

कोणतेही दुकान, मॉल, कार्यक्रम याठिकाणी आलेल्या व्यक्तींचे पूर्ण लीसकरण झालेले हवे. तसेच सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींचेही पूर्ण लसीकरण झालेले असावे. दरम्यान लसीकरण न झालेल्या व्यक्तींना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कार्यक्रम, समारंभासाठी ५० टक्क्यांची उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पूर्ण लसीकरण तसेच ७२ तासांपूर्वी केलेली आरटी पीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे. नव्या वर्षानिमित्त होणाऱ्या पार्टीवर नजर ठेवण्याकरता प्रत्येक वॉर्डमध्ये पालिकेची ४ पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number