जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
कुत्रा म्हटला की, तो सगळ्यांनाच आवडतो. पण, भटक्या कुत्र्यांची भिती सर्वांनाच वाटत असते. सध्या नगर शहरांत भटक्या कुत्र्यांची दहशत फार वाढली आहे. हे कुत्रे जमाव करून माणसांवर हल्ला करतात. पण, आता तर, त्यांनी प्राणीमात्रांवरही हल्ला करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील कोठी भागात बाबा जाधव या नागरिकास कुत्र्यांनी सामूहिक हल्ला करून जबर जखमी केले होते.
शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान, याच भागात राहणाऱ्या नागरिकाच्या घरसमोर गाईच्या वासराला कुत्र्यांनी हल्ला करून मारून टाकले. या घटनेमुळे या भागात नागरिक भयभीत झाले आहेत. आम्हाला चोराची नाही तर आता कुत्र्याची भीती वाटू लागली आहे. लहान मुले बाहेर सोडू शकत नाहीत. हे कुत्रे रात्रीच्या वेळेस एकत्रित हल्ला करून नागरिकांना जखमी करत असल्याचे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बाबा जाधव यांनी सांगितले.