Stray Dog ​Terror : सोयगाव तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा थरार; 3 वर्षीय चिमुरडीवर दहा-बारा कुत्र्यांचा हल्ला, प्रकृती गंभीर

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निंबायती गावात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीचे भीषण रूप समोर आले आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या अवघ्या तीन वर्षीय आयेशा अश्फाक बागवान या चिमुरडीवर दहा ते बारा भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात कुत्र्यांनी तिच्या मानेवर आणि डोळ्याजवळ गंभीर चावे घेतले. तसेच केस पकडून तिला काही फूट फरफटत […]

Stray Dog ​Terror  : सोयगाव तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा थरार; 3 वर्षीय चिमुरडीवर दहा-बारा कुत्र्यांचा हल्ला, प्रकृती गंभीर

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निंबायती गावात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीचे भीषण रूप समोर आले आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या अवघ्या तीन वर्षीय आयेशा अश्फाक बागवान या चिमुरडीवर दहा ते बारा भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात कुत्र्यांनी तिच्या मानेवर आणि डोळ्याजवळ गंभीर चावे घेतले. तसेच केस पकडून तिला काही फूट फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुरडीच्या आक्रोशाने ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. जखमी मुलीला प्रथम सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर निंबायती गावात भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत पसरली असून ग्रामस्थांनी तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

हेही वाचा : Honeymoon Coach : फुगे-फुलांचं डेकोरेशन, रेल्वेचा कोच बनला हनिमून सूट; व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाची कडक कारवाई

हिंगोलीतही मोकाट जनावरांचा सुळसुळाट

तर दुसऱ्या घटनेत हिंगोलीमधील वसमत शहरातील बहिर्जीनगर परिसरात मोकाट कुत्रे, डुक्कर तसेच इतर जनावरांचा सुळसुळाट वाढल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांचा कुत्र्यांनी पाठलाग केल्याच्या, तर काहींना चावा घेतल्याच्या घटनाही घडल्याचा पालकांचा आरोप आहे. या गंभीर समस्येकडे नगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची नाराजी असून, मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number