मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

थंड हवेच्या ठिकाण आणि स्ट्रॉबेरी यासाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. तसेच जंगलातील फळे, मध यासाठीही महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. या फळांवर अधिक संशोधन करण्याची गरज आहे. राज्यासह देशातही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड झाली पाहिजे. यासाठी एक संशोधन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिल्या. राजभवन येथील बैठक कक्षात महाबळेश्वर पर्यटन विकास […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

थंड हवेच्या ठिकाण आणि स्ट्रॉबेरी यासाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. तसेच जंगलातील फळे, मध यासाठीही महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. या फळांवर अधिक संशोधन करण्याची गरज आहे.

राज्यासह देशातही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड झाली पाहिजे. यासाठी एक संशोधन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.

राजभवन येथील बैठक कक्षात महाबळेश्वर पर्यटन विकास बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, जिल्हाधिकारी शेखर सिंग, कोल्हापूर वन परिक्षेत्राचे मुख्य वन संरक्षक डॉ बेन क्लेमंट, पोलीस अधीक्षक तेजश्री सातपुते, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, यांची उपस्थिती होती.

उत्तम संशोधन झाल्यास स्ट्रॉबेरीचा दर्जा आणि उत्पादन वाढेल. तसेच राज्यातील इतर अनुकूल भागांतही स्ट्रॉबेरी पिक घेता येऊ शकेल. यासाठी भर दिला पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाबळेश्वर एक लोकप्रिय ठिकाण असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठी संख्या असते. साहजिकच वाहनांची समस्या आहे.

यासाठी महाबळेश्वरच्या बाहेरील भागात मोठे वाहनतळ करून बॅटरी किंवा इलेक्ट्रिक संचलित वाहनांचा उपयोग करता येईल का हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

महाबळेश्वरप्रमाणे परिसरातील पर्यटन स्थळांचा देखील विकास होणं, ती लोकप्रिय होणे गरजेचं आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

येथील पर्यटन स्थळं विकसित करण्यासाठी कालबध्द रीतीने मंत्रालयातून मान्यता देण्यात येतील असेही ते म्हणाले.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

उत्तम दर्जाचे स्ट्रॉबेरी क्रीम उत्पादित करून त्याला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीनेही प्रयतन व्हायला हवेत. महाबळेश्वर येथे भारतातूनच नव्हे तर इतर देशातूनही पर्यटक येतात.

याठिकाणी बहुभाषिक पोलीस आणि मार्गदर्शक असल्यास विविध भाषिक पर्यटकांना त्याचा फायदा होईल, असे या प्रसंगी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number