कोकणात फुलली स्ट्रॉबेरीची शेती

स्ट्रॉबेरी म्हटल की, आपल्या डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्र्वर. मात्र, तुम्ही ही जी स्ट्रॉबेरीची शेती पाहता ही शेती तळकोकणातली आहे. तळकोकणच्या लाल मातीत स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. गेल्या तीन वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्यादीच्या पायथ्याशी घारपी गावात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जात आहे. हा चमत्कार घडवला सावंतवाडीतील घारपी गावातील जोश कर्णाई या प्रयोगशील शेतकऱ्याने. […]

कोकणात फुलली स्ट्रॉबेरीची शेती

स्ट्रॉबेरी म्हटल की, आपल्या डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्र्वर. मात्र, तुम्ही ही जी स्ट्रॉबेरीची शेती पाहता ही शेती तळकोकणातली आहे. तळकोकणच्या लाल मातीत स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. गेल्या तीन वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्यादीच्या पायथ्याशी घारपी गावात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जात आहे. हा चमत्कार घडवला सावंतवाडीतील घारपी गावातील जोश कर्णाई या प्रयोगशील शेतकऱ्याने. मूळचे केरळमधील कर्णाई कामानिमित्त मुंबईत आले. मुंबईत स्थाईक झाल्यानंतर त्यांनी तळकोकणात जागा घेतली. या जागेवर आता ते प्रयोगशील शेती करत आहेत. त्यात त्यांनी सध्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं आहे.

जोश कर्णाई हे अर्धा एकर जागेवर गेली तीन वर्ष स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेत आहेत. दिवसाआड त्यांना २५ किलो उत्पन्न मिळतं. सुरवातीला त्यांना ७०० रुपये किलो दर मिळाला. सध्या हा दर २५० रुपये आहे. स्थानिक सावंतवाडी बाजारपेठे सह गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीला मागणी आहे. कोकणातील उष्ण आणि दमट वातावरणात स्ट्रॉबेरीची शेती शक्य झाली आहे. घारपी गावातील वातावरण स्ट्रॉबेरी शेतीसाठी पूरक आहे. हनुमंत गडाच्या अगदी पायथ्याशी स्ट्रॉबेरीची ही शेती असल्याने पर्यटकदेखील या स्ट्रॉबेरीच्या शेतीला भेट देत स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेतात.

कोकणात भातपिकांसह आंबा, काजू, केळी, नारळाच्या बागायतीचं पीक घेतलं जातं. मात्र, आता महाबळेश्वरमध्ये केली जाणारी स्ट्रॉबेरीची शेतीही फुलवली जात आहे. सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी शेती केली जाते. त्यामुळे, या स्ट्रॉबेरीला चवदेखील चांगली आहे. अवघ्या ६ महिन्याच्या कालावधीचं हे स्ट्रॉबेरीच उत्पादन घेतलं जातं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number