राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. आता अशातच वादळी वाऱ्याने यात भर घातली आहे. कुठे पाऊस पडत आहे. तर, कुठे गारपिटीचा फटका बसत आहे. यातच उन्हाची तीव्रताही वाढत चालली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीतील पिकांवर देखील होतो आहे.
वादळी वाऱ्याच्या या माहाभयंकर लाटेने महाराष्ट्राला पूर्णतः झोडपून काढले आहे. यामध्ये काही घरांचे पत्रे उडाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली, झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. यात जनावरांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडून वीज प्रवाह खंडीत झाला आहे.