अकोल्यात दोन गटात तुफान राडा

अकोल्यात दोन गटात तुफान राडा झाला असून जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, २ पोलीस जखमी झाले आहेत. या प्रकरणी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, अकोल्यात सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे. अकोल्यात कलम १४४ लागू केले असून पोलिसांनी […]

अकोल्यात दोन गटात तुफान राडा

अकोल्यात दोन गटात तुफान राडा झाला असून जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, २ पोलीस जखमी झाले आहेत.
या प्रकरणी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, अकोल्यात सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे. अकोल्यात कलम १४४ लागू केले असून पोलिसांनी २६ जणांना ताब्यात घेतले आहे.

या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी रात्रीपासून पोलिस महासंचालक तसेच अकोला पोलिसांशी संपर्कात होते. अकोल्यात दोन गटात तुफान राडा झाला आहे. शेकडो लोक एकमेकांसमोर आले आणि एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर जाळपोळ करण्यास सुरुवात केली. यामुळे अकोल्यातील वातावरण चांगलंच पेटलंय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. तणाव अधिकच वाढल्याने अमरावतीहून राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त तुकड्या मागवल्या गेल्या. अकोल्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी अजूनही तणावपूर्ण शांतता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number