नाशिकच्या गंगापूर धरणातून सकाळपासून पाण्याचा सुरु असलेला विसर्ग संध्याकाळी अचानकपणे थांबवण्यात आला. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार सकाळी जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र 600 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाल्यावर अचानक जलसंपदा विभागानं पाणी सोडणं बंद केलं. मराठवाड्यासाठी जास्त पाणी सोडल्यास नाशिकला पाण्याचा तुटवडा जाणवेल असा शोध मात्र जलसंपदा विभागाला संध्याकाळी का जाणवला असा सवाल विचारला जाऊ […]
नाशिकच्या गंगापूर धरणातून सकाळपासून पाण्याचा सुरु असलेला विसर्ग संध्याकाळी अचानकपणे थांबवण्यात आला. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार सकाळी जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र 600 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाल्यावर अचानक जलसंपदा विभागानं पाणी सोडणं बंद केलं.
मराठवाड्यासाठी जास्त पाणी सोडल्यास नाशिकला पाण्याचा तुटवडा जाणवेल असा शोध मात्र जलसंपदा विभागाला संध्याकाळी का जाणवला असा सवाल विचारला जाऊ लागलाय. तर दुसरीकडे मराठवाड्याची तहान भागत नसल्याने मात्र मराठवाड्यातील जनता पुन्हा नाराज झाली आहे.