‘दादागिरी तात्काळ थांबवा’

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज रिफायनरी सर्वेक्षणातील दुसरा दिवस आहे. या सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे रत्नागिरी येथील बारसू गावात नागरिकांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, हे आंदोलन अधिक तीव्र झाले असून, पोलिसांनी रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या सुमारे 25 महिला आंदोलकांना ताब्यात घेल्याचे वृत्त आहे. एका बाजूला आंदोलन सुरु असतानाच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी […]

‘दादागिरी तात्काळ थांबवा’

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज रिफायनरी सर्वेक्षणातील दुसरा दिवस आहे. या सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे रत्नागिरी येथील बारसू गावात नागरिकांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, हे आंदोलन अधिक तीव्र झाले असून, पोलिसांनी रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या सुमारे 25 महिला आंदोलकांना ताब्यात घेल्याचे वृत्त आहे. एका बाजूला आंदोलन सुरु असतानाच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर भाष्य केले आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील हे सर्वेक्षण थांबवण्याची मागणी केली आहे. बारसू परिसरातील आंदोलकांवर दडपशाही करून सरकारला शेतकऱ्यांचे बळी घ्यायचे आहेत का? ही दादागिरी तात्काळ थांबवा, असं थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुनावलं आहे.

कोकणीतील निसर्गसौंदर्यावर घाला घालणारा कुठलाही प्रकल्प येऊ देणार नाही, असा निर्णय कोकणातील जनतेनं घेतला आहे. राजापूर तालुक्यातील बारसू आणि साळगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरीला येथील ग्रामस्थ गेल्या दोन वर्षांपासून विरोध करत आहेत. राज्य सरकारच्या प्रत्येक निर्णयाबरोबर हा विरोध अधिक तीव्र होत आहे. राज्य सरकारही रिफायनरीवर ठाम आहे. त्यातूनच काल इथं सर्वेक्षण घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. तेव्हापासून राजापूर तालुक्यातील वातावरण तापलं आहे. आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. त्या पार्श्वभूमवीर बारसू व साळगाव परिसरात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. आंदोलकांचे नेते सत्यजित चव्हाण व वैभव कोळवणकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतरही आंदोलक ठाम आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number