अमळनेर शहरात क्षुल्लक कारणाने दगडफेक

जळगाव, १० जून २०२३, प्रतिनिधी : जळगावच्या अमळनेर शहरात रात्री किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दगडफेक होत दंगली उसळली होती. लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून ही दंगल उसळली असून दोन गट समोरासमोर एकमेकांमध्ये भिडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवळकर यांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या अमळनेर शहरात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. […]

अमळनेर शहरात क्षुल्लक कारणाने दगडफेक

जळगाव, १० जून २०२३, प्रतिनिधी : जळगावच्या अमळनेर शहरात रात्री किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दगडफेक होत दंगली उसळली होती. लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून ही दंगल उसळली असून दोन गट समोरासमोर एकमेकांमध्ये भिडले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवळकर यांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या अमळनेर शहरात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान या बाबत पोलिसांनी दोन्ही धर्मातील सुमारे ३० ते ३५ लोकांना ताब्यात घेतले असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने अमळनेर शहरात कलम १४४ सोबत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number